
जल दिनाच्या पूर्वसंध्येला लाखो लिटर पिण्याचेपाणी गटारात वाया!
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): जागतिक जल दिनाच्या पूर्वसंध्येला हजारो लिटर पाण्याची नासाडी.शहरातील 80 फुटी रोड वरील रामदेव बाबा नगर जवळ असलेल्या व्हॉलला लागलेल्या गळतीतून लाखो लिटर पाणी गटारीत वाया.
‘बहती गंगा मैं हात धोलो ‘असे चित्र ऐंशी फुटी रस्ता वर दिसले.वाया जाणाऱ्या पाण्यातून वाहने धुवून घेतली तर काही जणांनी वाया जाणारे पाणी लोटगाडी वर भांड्यात पाणी भरून वाहुन नेले.तिथेच कपडे हि धुतले.
उन्हाळ्याची चाहूल लागताच पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू होते. शहरात आठ,दहा दिवसांआड पाणी येत. पाण्यासाठी नागरिकांना बरेचदा वणवण भटकावे लागते याचे गांभीर्य महानगरपालिकेला मुळीच नाही.
जलदिनाच्या पूर्वसंध्येला रामदेव बाबा नगर 80 फुटी रस्त्यावरती व्हॉल गळतीतून लाखो लिटर पिण्याचे पाणी अक्षरशः गटारीत वाहून जात असल्याची माहिती मिळताच एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी घटनास्थळी पाहणी करून महानगरपालिकेच्या अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेतले व वाया जाणार्या पाण्याच्या संदर्भात त्यांनी त्यांना जाब विचारला हजारो लिटर पाणी वाया जाते.आपण पाणी पुरवठा या भागात बंद ठेवायला हवा होता.आपल्याला गांभीर्य नाही असे खडसावून सांगितले.नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्या करता वणवण भटकावे लागते मनपाचे अधिकारी याबद्दल निरुत्तर राहिले आमदारांनी अधिकारी यांना तातडीने काम पूर्ण करावे गळती थांबवावी असे आदेशही दिले.