निलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार ?

Featured जळगाव
Share This:

उद्या दि.22रोजी यावल नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा.

निलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर मुख्याधिकारी यांच्या समक्ष संगनमताने निर्णय होणार ?

संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून

 

यावल (सुरेश पाटील): उद्या बुधवार दि.22रोजी यावल नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा दुपारी12;30वाजता यावल नगरपरिषद अध्यक्षा तथा स्थायी समितीच्या सभापती सौ.नोशाद तडवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.सभेत
निलंबित कनिष्ठ अभियंता शेख सईद यांच्या अपिलावर संगनमताने निर्णय होणार असल्याने याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.
स्थायी समितीचा अंजेठा प्रत्यक्ष बघितला असता एकूण14 महत्वाच्या विषयावर सभेत चर्चा होणार आहे विषय क्र.3बघितला असता महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम1965चे कलम79(6) पोट कलाम एक अन्वये शेख सईद शेख अहमद निलंबित कनिष्ठ अभियंता यांचे अपील अर्जावर विचार विनिमय करणे बाबतचा विषय घेण्यात आला आहे.
गेल्या महिन्यापूर्वी यावल नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी हे लाच स्वीकारतांना पकडले गेल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यापूर्वीच मुख्याधिकारी बबन तडवी यांनी यावल नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता शेख सईद यांना विविध कारणास्तव नोटीस देऊन निलंबित केले होते आणि आहे. निलंबित केल्यानंतर शेख सईद यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून सर्वांना विश्वासात घेऊन एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी अहवाल तयार करून संधितांकडे सादर केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर ज्या दिवशी ट्रॅप झाला त्याच दिवशी कनिष्ठ अभियंता यांची सुद्धा नियोजनपूर्वक चौकशीची तारीख होती परंतु मुख्याधिकारी दुसऱ्या प्रकरणातच पैसे घेताना पकडले गेले त्यामुळे कनिष्ठ अभियंता यांचा विषय तूर्त महिना-दोन महिने लांबणीवर पडला होता.परंतु आता स्थायी समिती याबाबत निर्णय घेणार असल्याने याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.कनिष्ठ अभियंता शेख यांना निलंबित केले होते ती कार्यवाही नाम मात्र होती का?आणि नाममात्र नसेल तर स्थायी समिती कनिष्ठ अभियंता यांच्या बाबत कोणत्या नियमाच्या आधारे विषयावर चर्चा करतील?तसेच तक्रारीनुसार हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होणार असून तत्कालीन लाचखोर मुख्याधिकारी आणि सेवानिवृत्त चौकशी अधिकारी व संबंधितांची जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरावरून चौकशी होणार असल्याने स्थायी समितीच्या निर्णयाकडे आणि मुख्याधिकारी यांच्या टिपणी/भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *