
राष्ट्रवादी युवक काँगेस च्या वतीने यावल कृषि उत्पन्न बाजार समिती यावल सचिव यांना निवेदन देण्यात आले
राष्ट्रवादी युवक काँगेस च्या वतीने यावल कृषि उत्पन्न बाजार समिती यावल सचिव यांना निवेदन देण्यात आले
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): कोविड -19च्या प्रादुर्भावामुळे बाजार समिती , खरेदी विक्री , नगर पालिका यांना निवेदन देण्यात आले की त्यांच्या मालकीच्या गाळेधारकांचे लॉक डाऊन मुळे झालेल्या नुकसामुळे भाडे माफ करण्यासाठी यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील विरावली यांनी मागणी केली आहे कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे तीन महिने पासून लॉक डाऊन चालू आहे त्या मुळे संबधित मालकीच्या यावल शहरातील सर्व शॉपिंग संकुल मधील दुकान ही तीन महिन्यापासून बंद आहेत त्या मुळे त्या दुकानदाराना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे त्या मुळे त्या गाळे घरकांचे तीन महिन्याचे भाडे माफ करण्यात यावे असे निवेदन राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ऍड देवकांत पाटील यांच्या नेतृत्वात बाजार समितीत देण्यात आले या वेळी प्रा मुकेश येवले सर , अन्वर खाटीक , विजय पाटील , एम बी तडवी ,किशोर माळी ,गणी खान, आयुब सर , कामराज घारू ,अरुण लोखंडे ,हेमंत येवले , राकेश सोनार आदी नी किशोर सोनवणे बाजार समिती सचिव यांना निवेदन देण्यात आले .याच आशयाचे निवेदन खरेदी विक्री संघ , नगर पालिका , फळ विक्री संघ फ्रुट सेल तसेच सहकार मंत्री , अर्थ मंत्री , मुख्यमंत्री यांना यांच्या मेल आयडी वर निवेदन पाठवण्यात आले आहे असे ऍड देवकांत पाटील यानी कळविले आहे .