राज्यातील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षकांना जूनी पेन्शन लागू करा या मागणी सह इतर प्रलंबित मागण्यासाठी निवेदन

Featured नंदुरबार
Share This:

राज्यातील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षकांना जूनी पेन्शन लागू करा या मागणी सह इतर प्रलंबित मागण्यासाठी निवेदन

 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): राज्यव्यापी निवेदन मोहिमेत महाराष्ट्रात तील सर्व जिल्ह्यासह नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना जूनी पेन्शन लागू करा. या प्रमुख मागणी सह इतर प्रलंबित मागण्यासंबंधीत निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीचे भान ठेवत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने सामाजिक दुरी ठेवून तसेच सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेतील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षकांच्या अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे असून याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब याचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्यव्यापी निवेदन मोहीम छेडण्यात आली. पहिल्या टप्यात काल दिनांक 7 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार मार्फत तालुकास्तरावर व आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावर मा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मा मुख्य कार्यकारी अधिकारी, व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे , नंदुरबार जिल्हाध्यक्ष आबा बच्छाव , जिल्हा संघटनमंत्री राकेश आव्हाड , राज्य कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बागल , जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश मोरे , महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतना चावडा , महिला आघाडी जिल्हा कार्यवाह मीनल लोखंडे , जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष सावंत , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोकुळदास बेडसे , नंदुरबार तालुकअध्यक्ष किरण घरटे , तालुका कार्यवाह अनिल देवरे , तळोदा तालुका अध्यक्ष मधुकर नागरे आदी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *