स्पार्टन डान्स स्टुडिओच्या ऑनलाईन नृत्य स्पर्धेला उर्त्स्फूत प्रतिसाद

Featured जळगाव
Share This:

जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि): येथील स्पार्टन डान्स स्टुडिओतर्फे आयोजित ऑनलाईन नृत्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात स्पर्धेकांची लॉकडाऊनमध्येही मोठी क्रेझ दिसून आली.
ही स्पर्धा २१ एप्रिल रोजी घेण्यात आली. दरम्यान, स्पर्धेकांसाठी ऑनलाईन वोटिंग करण्यात आले होते. त्याचा निकाल २५ रोजी जाहीर झाला आहे. त्यात अवनी सोनवणे प्रथम (१२८६ मते), कनीकशा चोपडे द्वितीय (९९३ मते), दिशीता प्रत्यानी (५२७ मते) तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उत्तेजनार्थ आश्वि अग्रवाल (३५३ मते) हिला घोषीत करण्यात आले.
या स्पर्धेस स्पार्टन डान्स स्टुडिओचे कोरेग्राफर खुशी माळी व अक्षय राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *