धुळे: परप्रांतातील व राज्यातील इतर जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे अडीच हजार विध्यार्थी, नागरिक यात्रेकरूना प्रयत्नाची पराकाष्टा करून आपल्या स्वगृही पोचविण्यात खासदार डॉ. सुभाष भामरे यांना यश

Featured धुळे
Share This:

परप्रांतातील व राज्यातील इतर जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे अडीच हजार विध्यार्थी, नागरिक यात्रेकरूना प्रयत्नाची पराकाष्टा करून आपल्या स्वगृही पोचविण्यात खासदार डॉ. सुभाष भामरे यांना यश

 

धुळे (जुनैद काकर ): कोरोना अर्थात कोविड – १९ या महामारीत संपूर्ण भारत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या कालावधीमध्ये देशभरासह परदेशातील अनेकजण इतरत्र ठिकाणी अडकले होते. त्या काळात हजारो नागरिकांसह महिलात्यांच्या मुला – बाळांसह त्यांना संबंधित ठिकाणी पोचण्यासाठी भारताचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे व मालेगांव लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत सुमारे अडीच हजार जणांना त्यांच्या कुटुंबियांसह सुखरूप त्यांच्या घरी पोचता आले आहे.  त्यामध्ये

Ø महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, नगर, रायगड, रत्नागिरी, नांदेड, सिंधुदुर्ग, गोंदिया, अकोला, नंदुरबार, चंद्रपूर, कोल्हापूर, पालघर,जळगांव, धुळेसह

Ø परप्रांतातून येणे किंवा परप्रांतीयांना जाण्यासाठी त्यात हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, गोवा, दिल्ली, तेलंगाना, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, हरियाना, राजस्थानसह आदी. राज्यातील नागरिकांचा समावेश आहे.

गेल्या दोन महिन्यापासून देशभरात कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले होते. या काळात देशातील सरकारी कार्यालय व खाजगी कार्यालय काही प्रमाणात बंद होते तर काही कार्यालयात १० ते १५% कर्मचारी वर काम सुरु होते. अशा परिस्थतीत अनेकजण नोकरी निमित्त, शिक्षणानिमित्त, परप्रांतात व इतर जिल्ह्यात अडकले होते, तर काही मजूर, विध्यार्थी, यात्रेकरू यांचाही यात समावेश होता. त्यांना सुखरूप आपल्या गावी पोहचविण्या करिता खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात समस्या निवारण केंद्र सुरु केले. या कार्यालयामार्फत अडकलेल्या नागरिकांना ई – पास परवानगीसाठी भरावयाचा अर्जासाठी आवश्यक ती लिंक सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाकारीकांमध्ये प्रसारित केली.  संबंधित नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना मिळालेला टोकन नंबर धुळे कार्यालयात कळविण्याची सूचना केली. मिळालेल्या टोकन नंबरच्या आधारे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला व प्राधान्याने  मंजूर करून घेतले व  नागरिकांना  शासनाकडून लागणारी परवानगी लॉकडाऊन च्या काळात मिळवून दिली. तसेच काही नागरिकांना विधिवत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येत नवती अशा नागरिकांना देखील खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या  समस्या निवारण कार्यालयातून सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करून अर्ज भरून दिले व परवानगीन मिळवून दिली.

तद्नंतर काही नागरिकांना मेडिकल इमर्जन्सी किंवा जवळच्या नात्यातील अंत्यसंस्कारासाठी तत्काळ परवानगी देण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ परवानगी मिळवून दिली.

तसेच धुळे व नाशिक  जिल्ह्यातून इतरत्र ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यांना धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी पास मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या संपर्क कार्यालयात विशेष सुविधा लॉकडाऊन काळात उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.

परराज्यातून व इतर जिल्ह्यातून  धुळे व नाशिक जिल्ह्यात परतणाऱ्यांसाठी संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोचविण्यात आले आहे. अशीही माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. आता पर्यंत देशातून सुमारे अडीच हजार नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांसह स्वगृही  आणण्यात यश आले आहे.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परीस्तीतीत विध्यार्थी व नागरिकाच्या समस्या संवेदनशील रित्या समजून घेऊन अतिशय निकडीच्या वेळी या सर्वांना केलेल्या हृद्य मदतीमुळे परराज्यातून व इतर जिल्ह्यातून  परत आलेल्या सर्व विध्यार्थी व नागरिकांनी दुरध्वनी व ई मेल व्दारे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे शातः आभार मानले आहे. केवळ आपला मतदार संघच नवे तर संपूर्ण महाराष्ट्रातून  आलेल्या किवा इथून तिकडे जाणाऱ्या नागरिकाच्या सामाश्यांसाठी तत्परतेने मदत करणाऱ्या खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून धन्यवाद देण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *