ओडिशा : पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं

Featured देश
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): ओडिशातील एका तरूणीला खूप रड रडणं जीवावर बेतलं आहे. पाठवणी दरम्यान प्रचंड रडल्यामुळे तरूणीला ह्रद्याचा झटका आल्याने तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ओडिशातील सोनपूर जिल्ह्यातील जुलुंदा गावात ही घटना घडली. गुप्तेश्वरी साहू हिचा विवाह गुरुवारी संध्याकाळी बोलंगीर जिल्ह्यातील बिसीकेसन प्रधानसोबत झाला. प्रथेनुसार शुक्रवारी सकाळी तिच्या पाठवणीची तयारी सुरु होती. सासरी जाण्यासाठी गुप्तेश्वरी निघत होती, तोच तिला हुंदका अनावर झाला आणि रडता-रडताच ती बेशुद्ध पडली. गुप्तेश्वरीला तातडीने डुंगुरीपल्लू कम्युनिटी हेल्थ सेंटरला पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. कार्डिअ‍ॅक फेल्युअरमुळे गुप्तेश्वरी साहूचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

पाठवणी करताना ती सातत्याने रडत होती. आम्हाला माहित आहे की ती अतीव दुःखात होती. तिच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं, असं एका गावकऱ्याने सांगितलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *