
आता सलमानची होऊ शकते चौकशी
मुंबई (तेज समाचार डेस्क) : सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कलाविश्वातील अनेकांची चौकशी केली असून त्यात सुशांतसंदर्भातील अनेक गोष्टींची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांचा जबाब नोंदविला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचीही चौकशी करण्यात आली . प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी चौकशी होऊ शकते. 14 जूनला सुशांतने मुंबईतील राहत्या घरात त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली. वैयक्तिक आयुष्य, करिअर की आणखी कोणत्या कारणामुळे सुशांतने असे पाऊल उचललं याचा तपास सुरू आहे. पोलीस वेगवेगळ्या मार्गाने तपास करत आहेत.