अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये शेतकऱ्याकडून यावल नगरपरिषदेला नोटीस

Featured जळगाव
Share This:

अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये शेतकऱ्याकडून यावल नगरपरिषदेला नोटीस.

शेतकऱ्यांच्या शेतात अनधिकृत अतिक्रमण करून बांधकाम.

यावल नगरपरिषदेचा प्रताप आणि बौद्धिक दिवाळखोरी उघड.

यावल (सुरेश पाटील): गेल्या तीन महिन्यापूर्वी यावल नगरपालिकेतर्फे2कोटी84लाख 38हजार516रुपये किमतीचा अतिरिक्त साठवण तलाव बांधण्यात आला आहे तो अतिरिक्त साठवण तलाव कार्यान्वित करू नये अशी लेखी स्वरूपात नोटीस वकिलामार्फत शेतमालक शेतकऱ्याऱ्याने नगरपरिषदेला दिली.
शेतकऱ्याच्या शेतात अनधिकृत अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या यावल नगरपरिषदेचा प्रताप आणि बौद्धिक दिवाळे नागरिकांच्या व प्रशासनाच्या समोर आले आहे.
अतिरिक्त तलाव निर्मितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.9/8/2020 रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती.त्यानुसार यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोलापूर येथील ठेकेदार अनिल शामराव पाटील यास दि.21जानेवारी2021रोजी 2 कोटी84लाख38हजार516 रुपयाचा कार्यादेश दिला आहे.(कार्यादेश सोलापूर येथील अनिल शामराव पाटील ठेकेदाराच्या नावाने असला तरी प्रत्यक्षात काम मात्र जळगाव येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने केले आहे या ठेकेदारास यावल नगरपालिकेच्या माध्यमातून काहीनी टक्केवारीच्या लालसेपोटी सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे हे सर्व यावलकराना ज्ञात आहे.)
दि.20ऑगस्ट2021रोजी यावल शिवारातील शेत गट नंबर 1489चे शेतमालक पराग जगन्नाथ पाटील,राकेश जगन्नाथ पाटील यांनी भुसावळ येथील एडवोकेट सतीश सरोदे यांच्या मार्फत यावल नगरपरिषदेला दिलेल्या नोटिशीत नमूद केले आहे की,यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी काम सुरू करणे पूर्वी शेतकऱ्यास लेखी सूचना देऊन तसेच संबंधितांकडून प्रत्यक्ष जागेवर मोजमाप करून चतुर्सीमा अंकित करून सदर गट नंबर1489 चे क्षेत्राचे लेव्हलिंग करून सरकारी खुणा मांडून, नकाशा काढून,वापर वहिवाटीचे रस्ते दर्शवून व महसूल दप्तरी नोंद प्रमाणित करणे कायदेशीर बंधनकारक होते व आहे परंतु यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी, जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता,तसेच जळगाव पाटबंधारे विभागाचे यावल येथील उपविभागीय अधिकारी,विशेष भू संपादन अधिकारी,कार्यकारी अभियंता पर्यावरण व स्थापत्यशास्त्र पाणी पुरवठा विभाग जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव यांनी याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाईची पूर्तता न करताच बेकायदेशीर पणे अतिरिक्त साठवण तलाव योजना सुरु केली आहे.
शेत मालकाचे सुमारे एक हेक्टर 80 आर या क्षेत्राचे बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून गिळकृत करण्याचे विचारात आहात तुमचे सर्वांचे कृत्य मुळातच बेकायदेशीर असून शेत मालकाचे मूलभूत हक्काचे हनन करणारे आहे.फौजदारी, दिवाणी कारवाईस पात्र झालेले आहात.शेत मालकाचे मालकीचे व वहिवाटीचे गट नंबर1489 मधील सुमारे एक हेक्टर 80 आर क्षेत्रात अतिक्रमण केलेले आहे या क्षेत्राची आज रोजी सुमारे पाच कोटी रुपये बाजारभावाने किंमत आहे. सिटीसर्वे यांनी जागेवरच शासकीय गुण माफत केलेले नसल्यामुळे यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना नियमाप्रमाणे कोणताही ठराव पारित होऊन त्यास जिल्हाधिकारी जळगाव यांनी मंजुरी दिलेली नसल्यामुळे साठवण तलाव कार्यान्वित करू नये असे दिलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे हे अतिरिक्त साठवण तलावाच्या प्राप्त तक्रारी आणि शेतकऱ्याकडून प्राप्त नोटीस संदर्भात चौकशी करून काय निर्णय घेतात याकडे तसेच नगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या प्रतापाबाबत आणि बौद्धिक पातळी बाबत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.

पाटबंधारे उपविभागीय अभियंता यांनी परवानगी दिली कशी ?

जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत यावल येथील तत्कालीन पाटबंधारे उपविभागीय अभियंता यांनी यावल नगरपालिकेला अतिरिक्त साठवण तलाव बांधकामासंदर्भात कागदपत्रांची पडताळणी न करता परवानगी दिलीच कशी?असा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे यात तत्कालीन अभियंत्याची यावल विभागातील इतर कामांची सुद्धा चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.

ठेकेदाराची चलाखी आणि हुशारी. ..

 

अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामाबाबत अनेक तक्रारी असताना आणि काम अपूर्ण असताना कामाचे2कोटी 84लाख38हजार516रुपयांपैकी जवळजवळ अंदाजे दोन कोटी तीस लाख रुपये बिल संबंधितांना विश्वासात घेऊन काढून घेतल्याचे तसेच ठेकेदाराने या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करून टाकले असले तरी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करायला पाहिजे तसेच अनामत रक्कम ठेकेदाराला देऊ नये आणि ठेकेदारावर पुढील कारवाई करावी अशी प्रतिक्रिया यावल नगरपालिका अध्यक्षा सौ.नोशाद तडवी यांनी दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *