‘मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये’- त्या व्हायरल मेसेजवर सरकारने दिलं स्पष्टीकरण

Featured मुंबई
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क): देशात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. 1 मे 2021 पासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होत आहे की, मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये. व्हायरल होणाऱ्या या मेसेजवर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

महिलांनी मासिक पाळीच्या 5 दिवस अगोदर आणि 5 दिवस नंतर कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये, असं सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. यामुळे  नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

महिलांनी मासिक पाळीच्या 5 दिवस अगोदर आणि 5 दिवस नंतर कोविड प्रतिबंधक लस घेऊ नये असा दावा करणारा मेसेज खोटा आहे. अफवांना बळी पडू नका., असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे .

महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. यातील माहिती खोटी असून मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका, असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *