दिल्ली: ‘कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसा नाही’; केजरीवाल सरकारनं केंद्राकडे मागितले ‘इतके’ हजार कोटी

Featured देश
Share This:

 

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या संकटाशी लढताना दिल्ली सरकारची तिजोरी आता रिकामी झाली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे केजरीवाल सरकारनं केंद्र सरकारकडे 5,000 कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळं दिल्ली सरकारची 85 टक्के कर वसुली थांबली आहे. त्यासाठी मोठ्या तातडीच्या मदतीची सरकारला गरज आहे, असं उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद आणि ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून 5000 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर केंद्राच्यावतीनं राज्यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यता निधीची रक्कमही दिल्लीला अद्याप मिळालेली नाही, असं सिसोदिया यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारच्या तिजोरीत आता पुरेसा पैसाच शिल्लक राहिलेला नाही. कर्मचाऱ्यांचे पगार आणि गरजेच्या खर्चांसाठी सरकारला 3,500 कोटी रुपयांची गरज भासते मात्र आत्तापर्यंत एकूण 1735 कोटी रुपयांचाच महसूल गोळा झाल्याची माहिती आहे.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *