कोणत्याही प्रकारचा निवडणूक कार्यक्रम राबवू नये- बामणोद उपसा जलसिंचन पाणी वापर संस्थेला पत्र

Featured जळगाव
Share This:

कोणत्याही प्रकारचा निवडणूक कार्यक्रम राबवू नये- बामणोद उपसा जलसिंचन पाणी वापर संस्थेला पत्र

ऑनलाइन मराठी तेज समाचार कॉम वृत्ताची दखल.

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील बामणोद् उपसा जलसिंचन पाणी वापर संस्थेने कोणत्याही प्रकारचा निवडणूक कार्यक्रम राबवू नये असे लेखी पत्र यावल येथील पाटबंधारे विभागातील उपविभागीय अभियंता यांनी दिनांक 24/9/2020 रोजी काढले त्यामुळे तसेच बामणोद उपसा जलसिंचन पाणीवापर संस्था निवडणुकीची नोटीस संशयास्पद असे वृत्त मराठी तेज समाचार कॉम प्रसिद्धी माध्यमातून दि.24/9/2020 रोजी सर्वात प्रथम प्रसिद्ध झाले त्यामुळे मराठी तेज समाचार कॉम या ऑनलाइन वृत्ताची दखल घेतल्याचे संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.
जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव कार्यकारी अभियंता यांना दि. 24/9/2019 रोजी दिलेल्या पत्रात यावल येथील उपविभागीय अभियंता यांनी म्हटले आहे की यावल

उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व 13 पाणी वापर संस्थेच्या निवडणूका घेणे बाबत कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव कडून आदेश प्राप्त होते.तथापी बामणोद पाणी वापर संस्था वगळता इतर संस्थेच्या पाणी वापर संस्थांनी अद्याप पावेतो कुठलाही प्रतिसाद दिला नाही.परंतु बामणोद उपसा जलसिंचन पाणी वापर संस्था बामणोद च्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करणेकामी या उपविभागास अहवाल प्राप्त झाला होता. परंतु सदर बिनविरोध निवडणूक कामी बामणोद गांवातील भागवत दयाराम फेगडे यांनी दि.23/9/2020रोजी हरकत घेतली आहे.त्यानुसार पुढील निवडणूक सार्वत्रिक होणेसाठी त्या कालावधीपर्यंत या पाणी वापर संस्थांवर प्रशासक नेमणे आवश्यक आहे.कारण सद्यस्थितीत कोविड-19 (कोरोना)चे संकट महाराष्ट्रात चालू असून शासनाच्या इतर ग्रामपंचायत निवडणूका सुध्दा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या असून फक्त प्रशासक नेमलेले आहेत.या धोरणानुसार सदर निवडणूका ह्या 6 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात जेणे करून भविष्यात वरीष्ट पातळीवरून त्या वेळेनुसार परवानगी घेऊन मोकळया वातावरणात निवडणूका घेणे शक्य होईल.तरी सद्यस्थितीत या 13 पाणी वापर संस्थेवर तात्पूरता प्रशासक नेमण्यात यावा. असे दिलेल्या पत्रात म्हटले असून त्याची प्रत माहितीस्तव बामणोद उपसा जलसिंचन पाणीवापर संस्था चेअरमन दिले आहे. त्यामुळे आता बामणोद उपसा जलसिंचन पाणी वापर संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती होते किंवा कसे ?याकडे संपूर्ण यावल तालुक्यासह पाणी वापर संस्थेच्या सभासदांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *