चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल

Featured जळगाव
Share This:

चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल.

 

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.यावल तहसिलदारांकडे एकूण दहा सदस्य पैकी ग्रामपंचायतीतील उपसरपंचासहित8सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
चुंचाळे ता.यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या तीन वर्षापूर्वी डिसेंबर2017मध्ये सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या.तर गेल्या काही महिन्यापासून सरपंच पाटील या उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नाही म्हणून सोमवारी येथील तहसील कार्यालयात उपसरपंच नाजिमा अन्वर तडवीसह सदस्यांनी तहसील कार्यालय गाठुन व सरपंच सुनंदा पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला आहे.या अविश्वास प्रस्तावावर सुकलाल यशवंत पाटील,अनिल पंडीत कोळी, अरमान मनवर तडवी,दगडू किताब तडवी,शारदा सुधाकर चौधरी,नवशाद सायबु तडवी,जयनूर संजय तडवी,व सिंधुबाई संजय पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तेव्हा एकूणच लोकनियुक्त सरपंच यांच्याविरुद्ध दाखल करण्याच्या झालेल्या अविश्वास ठरावावर आता तहसीलदार कोणत्या तारखेला विशेष सभा बोलवतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *