मुंबई दरवर्षी का तुंबते, नितीन गडकरी यांचा सवाल

Featured मुंबई
Share This:

नागपूर  (तेज समाचार डेस्क):केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीलं आहे. मुंबईतील पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं गडकरींनी म्हटलमुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करुन वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यात यावा, असं गडकरींनी म्हटलं आहे.

मुंबईत पुरामुळे दरवर्षी मोठं नुकसान होते. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्याचे योग्य नियोजन करावं, असा सल्ला देखील नितीन गडकरींनी दिला आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी नमका प्रश्न केल्याने शिवेसना पेचात पडली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. दरवर्षी याच विषयावर चर्चा होते, पण मार्ग निघत नसल्याने लोक नाराज आहेत. पावसाळ्यातील मुंबईकरांची हालात अत्यंत वाईट असते. आता तोच मुद्दा करून शिवसेनेला अडचणीत आणायचे अशीही भाजपची व्युहरचना असू शकते असे सांगण्यात आले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *