यावल तालुक्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांनी केली मोठी गर्दी; प्रशासन कोमात आणि कोरोना जोमात

Featured जळगाव
Share This:

यावल  (सुरेश पाटील) कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या कार्यक्षेत्रात आणि तहसीलदार जितेंद्र कूवर,प्रभारी पोलिस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण यांच्या शासकीय कार्यालयापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील चुंचाळे परिसरात निंबादेवी धरणावर दररोज पर्यटकांची हजारोच्या संख्येने मोठी यात्रा ( गर्दी ) भरत असल्याने तसेच त्या ठिकाणी तरुणांमध्ये आपआपसात जोरात भांडणतंटे शाब्दिक चकमकी होत असून याठिकाणी मोठी अप्रिय घटना घडणार असल्याचे सुद्धा संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.संबंधित सर्व प्रशासनाने वेळीच दक्षता बाळगून निंबादेवी धरणावर होणारी पर्यटकांची गर्दी तात्काळ बंद करावी अन्यथा कोरोना विषाणूचा संसर्ग यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात झपाट्याने वाढणार असल्याने याला सर्व प्रशासन यंत्रणा जबाबदार राहणार असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे.

उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यावल तालुक्यात कोरोना विषाणू संदर्भात वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना व आदेश देऊन नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलेले आहेत.

कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून यावल पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी गेल्या चार महिन्यात रात्रंदिवस स्वतः आणि आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठी मेहनत घेतली. यात वेळेप्रसंगी त्यांनी नियम मोडणाऱ्या विरुद्ध मोठ्या स्वरूपात दंडात्मक कार्यवाही केलेली आहे आणि या कार्यवाहीमुळे संपूर्ण यावल पोलीस स्टेशन हद्दीत आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा जनतेवर मोठा वचक बसला होता आणि आहे. परंतु गेल्या पंधरावीस दिवसापासून ते स्वतः कोरोनाग्रस्त झाल्यामुळे ते क्वारनटाईन झालेले झाले होते. यामुळे काही नागरिकांनी कायदेशीर शिस्त मोडून टाकली पोलीस निरीक्षक अरुण धनवडे कार्यरत असते तर निंबादेवी धरणावर पर्यटकांची एवढी मोठी गर्दी त्यांनी होऊन दिली नसती असे सुद्धा संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

याच प्रकारे यावल महसूल विभाग, यावल नगरपालिकेतील कार्यालयीन अधीक्षक बडे, स्थापत्य अभियंता योगेश मदने, स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रमाकांत मोरे, व इतर सर्व नगरपालिका कर्मचारी यांच्यासह यावल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी.बी. बारेला, औषध निर्माण अधिकारी सूर्यकांत पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके आणि यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांनी सुद्धा कोरोना विषाणू संदर्भात आप-आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडली आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून आज संपूर्ण यावल शहरात कोरोना विषाणू नगण्य स्वरूपात दिसून येत आहे.

अशा परिस्थितीत तालुक्यातील निंबादेवी धरणावर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पर्यटकांची हजारोच्या संख्येने मोठी गर्दी होत आहे शासन-प्रशासन कोमात गेले आहे का? जनतेमध्ये असा प्रश्न उपस्थित केला जात असून या मोठ्या गर्दीत पर्यटक आपल्या मौजमस्ती मध्ये माक्स आणि डिस्टन्स सिंगचा वापर 100 टक्के विसरून गेल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने प्रभारी पोलिस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण यांनी तात्काळ निंबादेवी धरणावर पोलिस बंदोबस्त वाढवून पर्यटकांची होणारी मोठी गर्दी तात्काळ बंद करावी अन्यथा पर्यटकांच्या माध्यमातून यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण पुन्हा जोमात वाढतील असे बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *