
यावल शहरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक-एलसीबीची कारवाई, पोलीसात गुन्हा दाखल
यावल शहरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक-एलसीबीची कारवाई, पोलीसात गुन्हा दाखल
यावल (सुरेश पाटील): शहरातील बुरूज चौकात गावठी पिस्तूल कमरेला लावून दहशत माजविणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मंगळवारी27जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता अटक केली असून त्याच्या ताब्यातील२०हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केला आहे.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश राजेंद्र पाटील वय-22रा. सुंदरनगरी यावल असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार यावल शहरातील बुरूज चौकात एक तरूण बेकायदेशीर व विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली.त्यानुसार पथक जळगावहून यावलला आज मंगळवारी 27जुलै रोजी दुपारी दाखल झाले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन,शरीफ काझी,पोलीस नाईक युनुस शेख, किशोर राठोड,पोलीस कान्स्टेबर विनोद पाटील,रणजित जाधव यांनी कारवाई केली.दुपारी पथकाने सापळा रचून संशयित आरोपी यश राजेंद्र पाटील याला अटक केली.त्याच्या ताब्यातील 20हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे.यावल पोलीस ठाण्यात पो. का.रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.