
महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय येथे नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार
महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय येथे नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि ): शिरपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले(मल्टी टेक) माध्यमिक विद्यालय येथे थाळनेर येथील संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक पदावरून पदोन्नती होऊन मुख्याध्यापक पदी नियुक्त झालेले बापूसाहेब श्री व्ही.बी.सोनवणे यांच्या विद्यालयातील एन सी सी विभाग व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांच्या मार्फत शाल श्रीफळ नारळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच नूतन उपमुख्याध्यापक आबासाहेब श्री एस.पी बोरसे यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षक श्री.जे पी गोसावी यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील एन सी सी अधिकारी श्री.एच.के.शेटे सर व निलेश महाजन सर यांनी केले.