राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून आमदार जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.

Featured जळगाव
Share This:

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून आमदार जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.

यावल (सुरेश पाटील):दि.12 रोजी तालुक्यातील भालोद येथील स्वर्गीय माजी खासदार व माजीआमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी दि.12 रोजी सायंकाळी 05:45 वाजता मंत्री जयंत पाटील व त्यांच्यासोबत माजी महसूल मंत्री एकनाथ रावजी खडसे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष एडवो.रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार हरिभाऊ जावळे यांच्या पत्नी श्रीमती कल्पना जावळे व त्यांचे चिरंजीव अमोल हरिभाऊ जावळे तसेच त्यांच्या मातोश्री सुमनबाई जावळे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे 16जुन 2020 रोजी अकाली कोरोना या महाभयंकर आजारामुळे निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील हे दिनांक 12 रोजी भालोद तालुका यावल येथे उपस्थित झाले होते प्रसंगी जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते मसाका चेअरमन शरद महाजन भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण चौधरी व सभापती दीपक पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले आदींसह भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यासह जिल्हा परिषद सदस्य सौ भालेराव यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *