राष्ट्रवादी युवक काँगेस तालुकाध्यक्षपदी एड. देवकांत बाजीराव पाटील यांची हैट्रिक

Featured जळगाव
Share This:
पक्ष वाढीसह केलेल्या उत्कृष्ट कामांची पक्षांकडून दखल

यावल ( सुरेश पाटील ) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या यावल तालुकाध्यक्षपदी विरावली येथील एड. देवकांत बाजीराव पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्य युवक कार्यकारिणीत यावल तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. त्यांची ही निवड प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई तसेस जिल्ह्य युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी केली .
अॅड.देवकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष पद भूषविले आहे. त्यादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदने, परीक्षा कालावधीतील भारनियमन बंद करणे, शिष्यवृत्ती आदी समस्यांविरोधात आवाज उठविला होता. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन व पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी जागृती करून सतत दोन वर्ष विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. यासह त्यांचे संघटन कौशल्य व पक्ष वाढीसाठी व पक्ष रूजविण्यासाठी केलेल्या कामांची दखल घेत त्यांची वरिष्ठांनी तालुका अध्यक्ष म्हणून निवड केली होती ,ती सार्थ ठरवत , त्याना पुन्हा ही जबाबदारी सांभाळत असताना ग्रामीण भागातील युवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या समस्यांविरोधात आवाज उठविणे, त्या सोडविण्यासाठी धडपड करणे, युवकांचे संघटन वाढविणे, पक्षाने दिलेले आदेशानुसार कार्यक्रम राबविणे, आंदोलन करणे, निवेदने विविध जबाबदार्‍या योग्य पद्धतीने त्यांनी पार पाडल्या. कर्जमाफी, पीक विमा, यासह विविध बाबींवर त्यांनी आंदोलनाद्वारे आवाज उठविला , प्रशासनाला निवेदने दिली , राजकारणात समाजकारणा प्राधान्य देऊन पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सामान्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी जनजागगृती केली. योजनांचा पाठपुरावा करून सामान्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी मास , सॅनिटायझर , आणि आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप करून काही मोजक्या राष्ट्रवादी च्या युवक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करोना विषयक जनजागृती चे काम केले या व अशा अनेक कामांची पावती म्हणून
त्यांची ( तिसऱ्यांदा ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फेरनिवड करण्यात आली आहे. निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे, त्यात जिल्ह्यातून राष्ट्रवादी चे जिल्ह्याध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्यासाहेब पाटील,माजी प्रदेश अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी,प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतिष आण्णा पाटील , माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर , आमदार अनिल पाटील , माजी आमदार अरुण पाटील , जिल्ह्याउपाध्यक्ष संतोष भाऊ चौधरी , जिह्यासमन्वयक विकास पवार , जिल्ह्यकार्याध्यक्ष विलास पाटील जिल्ह्य प्रवक्ता योगेश देसले , प्रदेश सरचिटणीस ललित बागुल , महानगर अध्यक्ष अभीषेक पाटील, जिल्ह्यायुवक कार्याध्यक्ष दीपक पाटील , महिला उपप्रदेशाध्यक्ष विजयाताई पाटील, महिला जिल्ह्य अध्यक्ष कल्पना पाटील, युवती जिल्ह्याध्यक्ष कल्पिता पाटील ,यांनी
तर यावल तालुक्यातून तालुका अध्यक्ष मुकेश येवले , जिल्ह्या आदिवादी आघाडीचे एम. बी. तडवी, प्रदेश सदस्य शुक्राम आण्णा पाटील , सीताराम पाटील , दिनकर पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे,माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, सुखदेव बोदडे , गिरीधर पाटील , शशिकांत पाटील, डॉ. हेमंत येवले , चंद्रकांत येवले , अभिमन्यू चौधरी , सईद भाई , गनीखान , प्रशांत चौधरी , फैजपूर अध्यक्ष अन्वर खाटीक , दीपक पाटील , गुणवंत निळं, राज कोळी , प्रशांत पाटील, किशोर( गोलू) माळी, नरेंद्र शिंदे, कामराज घारू , हितेश गजरे , प्रदीप पाटील , पवन राजपूत , ललित पाटील , अरुण पाटील , आशुतोष पाटील, अरुण लोखंडे , विनोद पाटील , निर्मल पाटील, नरेंद्र पाटील , योगेश पाटील , किरण साठे ,भूषण पाटील, भैया पाटील, राकेश सोनार लखन पवार , परेश साठें आदींनी अभिनंदनसह भावी वाटचाली साठी शुभेच्या दिल्या आहेत .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *