
नवापूर: भुकेला मजुरांचा फोटो सोशल मिडीयावर टाकताच अवघ्या 15 मिनटात विनय गावीत यांनी दिले जेवण
नवापूर: भुकेला मजुरांचा फोटो सोशल मिडीयावर टाकताच अवघ्या 15 मिनटात विनय गावीत यांनी दिले जेवण
नवापूर भुकेला मजुरांचा फोटो सोशल मिडीयावर टाकताच अवघ्या 15 मिनटात विनय गावीत यांनी दिले जेवण(तेज समाचार प्रतिनिधी): नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र चव्हाण हे सकाळी आपल्या प्रभाकर काँलनीचा घरातुन महामार्गावरुन गावात येत असतांना होटेल कृणाल जवळ काही मजुर पायी व्याराहुन जळगावकडे जात असतांना थांबले होते त्यांचा जवळ लहान मुले ही होते.भुकेने सर्व त्रस्त झाले होते.लहान मुल रडत होती.महेंद्र चव्हाण यांनी माणुसकीचा भावनेतुन मजुरांचे फोटो काढुन सोशल मिडीयावर टाकले आणि काय फक्त १५ मिनटातच नागझरी शाळेचे मुख्याध्यापक तथा माजी नगरसेवक विनय केशव गावीत सर यांनी मजुरांना भोजन व पाण्याची व्यवस्था केली त्या नंतर अनेक सेवाभावी काम करणारे दाते त्या ठिकाणी पोहचलेत खरोखर नवापूरचा दातृत्वाला सलाम अशी प्रतिक्रिया येत होती.नवापूरकर अजूनही गरजूंच्या मदतीस तत्पर दिसुन येत असुन जातीधर्माच्या पलिकडे माणुसकीचा धर्म जपणा-या नवापूरकरांचा ख-या खु-या माणसांना धन्यवाद दिले जावे थोडे कमी आहे असे बोलले जात आहे.विनय गावीत सर हे कुठलीही प्रसिध्दी न करता सामाजिक व शैक्षणिक मदत करत असतात.कोरोणाचा या संकट काळात गरजुना मदतीचा हात त्यांनी दिला आहे.लोकांची कामे करत राहायची या भावनेतुन ते प्रसंगानुरुप मदतीसाठी धावुन आल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो.करंजी ओवारा भागात त्यांचे कार्य मोठे आहे.