दिनांक 14 रोजी यावल नगराध्यक्षपदी श्रीमती नौशाद तडवी यांची बिनविरोध निवड होणार

Featured जळगाव
Share This:

दिनांक 14 रोजी यावल नगराध्यक्षपदी श्रीमती नौशाद तडवी यांची बिनविरोध निवड होणार.

यावल  ( सुरेश पाटील ): यावल नगरपरिषद शिवसेनेच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी या जात प्रमाणपत्र अभावी अपात्र झालेल्या होत्या आणि आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव यांनी निवडणूक संदर्भात आदेश दिल्याने दिनांक 14 रोजी विशेष सभेत निवड होणार आहे यावल नगर परिषदेतील एसटी महिला प्रवर्गातील एकमेव असलेल्या श्रीमती नौशाद मुबारक तडवी यांची बिनविरोध निवड होणार आहे.
जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार यावल नगराध्यक्ष निवडणुक दिनांक 14 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे, नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नगराध्यक्षपदाची जागा एसटी महिला या प्रवर्गासाठी राखीव असून नगरपालिकेच्या सदस्यां मधे एसटी प्रवर्गातून एकमेव निवडून आलेल्या सदस्या श्रीमती नौशाद तडवी याच असल्याने त्यांचीच बिनविरोध निवड होणार आहे त्यामुळे त्यांचे आजपासूनच सर्व स्तरातून अभिनंदन सुरू झाले आहे .

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *