
जामनेर: राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने पीपीइ किटचे वाटप
शेंदुर्णी तालुका जामनेर (तेज समाचार प्रतिनिधि ) : राष्ट्रवादी काँग्रेस सोशल वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जळगाव जिल्हा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी व वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या साठ गावातील ए. एन. एम., एम एम पी डब्ल्यू व आशा सेविका यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या हस्ते फेस शील्डचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शेंदुर्णी व वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निकम, डॉ.संदीप पाटील तसेच डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितिन पाटील तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, तालुकाध्यक्ष राजू पाटील व सदस्य डॉ. किरण सूर्यवंशी, जामनेर शहराध्यक्ष जितेश पाटील, युवक अध्यक्ष शैलेश पाटील, राजू जेंटलमॅन, निलेश भगत, विलास जोशी, योगेश पाटील, अर्जुन पाटील, फारुख खाटीक, योगेश गुजर, गजानन धनगर, धीरज जैन तसेच स्थानिक डॉ. अजय सुर्वे, डॉ. महेंद्र बोरसे, डॉ.स्वप्नील बारी, डॉ. स्वप्नील संघवी, डॉ. नीलम कुमार अग्रवाल, डॉ अतुल पाटील हे उपस्थित होते याकामी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांनी मेहनतघेतली.