जळगाव:  नाथ फाऊंडेशन जळगावच्या अन्नछत्राला मा.महसूल-कृषीमंत्री माननीय एकनाथरावजी खडसे ची भेट

Featured जळगाव
Share This:

एक लाख चाळीस हजार गरजुंची भुक भागविण्यासाठी राबणाऱ्या कोरोना योद्ध्यांची मा.मंत्री खडसे यांच्याकडुन कौतुक

 जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ) : राज्यातील कोरोणा च्या पार्श्वभूमिवर दिनांक 23 मार्चपासुन जळगाव येथील लाडवंजारी मंगलकार्यालयात मा.महसूल-कृषीमंत्री श्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाऊंडेशन जळगाव च्या वतीने शहरातील गोरगरीब व परप्रांतीय मजुरांकरांना दोन वेळेचे जेवण मिळाव म्हणुन अन्नछत्र उभारण्यात आले आहे.

आज दिनांक 3 मे रोजी लोकनेते तथा मा.महसूल-कृषीमंत्री श्री एकनाथरावजी खडसे यांनी लाडवंजारी मंगलकार्यालयात उभारण्यात आलेल्या अन्नछत्राला भेट देऊन नाथ फाऊंडेशन च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य त्या काळजी घेऊन आपण हे कार्य उत्तमरीत्या पार पाडत असल्याने समाधान वाटले व वडीलधारी व्यक्ती म्हणुन तुमच्या सर्वांच्या पाठीवर शाबासकी ची थाप देण्यासाठी आपणा सर्वांना भेटण्याकरता इथे आल्याचे सांगितले.
तसेच स्वत:ची काळजी घेण्यासंदर्भात सुचना देखील दिल्या.
यावेळी नाथ फाऊंडेशन चे अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, दिलीपभाऊ माहेश्वरी, सुनिलभैय्या माळी, डॉ.अभिषेक ठाकुर, लोकेश मराठे, गणेश चौव्हाण, नितिन महाजन, धिरज काबरा, योगेश लाडवंजारी, रीतेश लाडवंजारी, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी सचिन माळी, तलाठी रमेश वंजारी , मिलिंद लोणारी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी महसूल-कृषीमंत्री श्री एकनाथरावजी खडसेंसोबत नाथ फाऊंडेशन चे अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, दिलीपभाऊ माहेश्वरी, सुनिलभैय्या माळी, डॉ.अभिषेक ठाकुर, लोकेश मराठे व इतर

सदरील अन्नछत्राच्या माध्यमातुन मागील 40 दिवसांपासुन जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी, पंचशील नगर, खेडी, लक्ष्मी नगर, समता नगर, उजाड कुसुंबा, तट्याभील सोसायटी, पिंप्राळा, तांबापुर गवळी वाडा, शिवाजी नगर, इच्छादेवी नगर परीसरातील गोरगरीबांना रोज सकाळ-संध्याकाळी सुमारे 2500 ते 3000 अन्नाचे पॉकीट घरपोच वाटप करण्यात येत आहे.
तसेच 40 दिवसांच्या कालावधीत हनुमान जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया सारख्या सणांच्या दिवशी गोड पदार्थ या पॉकीट मध्ये समाविष्ट करण्यात आले होते जणेकरुन गरीबांना देखील आपले सण साजरे करता आल्याच मानसिक समाधान देखील होईल अशी विशेष काळजी घेण्यात आली.
आजपर्यंत नाथ फाऊंडेशन च्या अन्नछत्राच्या माध्यमातुन सुमारे एक लाख चाळीस हजार अन्नाचे पॉकीट वाटप करण्यात आलेले आहे.

सदरील अन्नछत्राला यांचे आहे सहकार्य…
नाथ फाउंडेशन , संत गोदडीवाले बाबा हरदास सेवा मंडळ ,जैन इरिगेशन , शिवसह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद , रतनलाल सी. बाफना गोशाळा, हितेश प्लास्टिक जळगांव, साई संस्थान पाळधी, नव युवक अग्रवाल समाज मंडळ जळगांव, माहेश्वरी समाज मित्र मंडळ जळगांव, गिरीश जी पाल , स्वामी समर्थ सेवा मंडळ नशिराबाद , प्रेमराज कलंत्री जळगांव,समस्त लाडवंजारी मंगल कार्यालय व जळगाव शहरातील दानशूर मंडळी यांचे या ठिकाणी अनमोल सहकार्य आहे.

नाथ फाऊंडेशन ने लॉकडाऊन च्या काळात राबविले विविध उपक्रम…
लॉकडाऊन च्या सुरवातीला नाथ फाऊंडेशन च्या वतीने चौका चौकांवर बंदोबस्ताकरीता असलेल्या पोलिसांना व रस्त्यावरील गोरगरीब लोकांना बिस्लेरी पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले.
तसेच शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये 8000 मास्क चे वाटप केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *