नाशिक : उपराष्ट्रपतींना पाठवली एक लाख पत्रं

Featured नाशिक
Share This:

नाशिक : उपराष्ट्रपतींना पाठवली एक लाख पत्रं

नाशिक  (तेज समाचार डेस्क) : : राज्यसभेच्या सदस्यांची शपथ घेत असतांना महाराष्ट्राची अस्मिता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसाने देखील शपथ घेतली. त्याप्रसंगी छत्रपतींचा अपमान होईल अशा प्रकारच्या सूचना कडक शब्दात उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी वापरल्या त्याचा निषेध म्हणून राज्यभरातून २० लाख “जय भवानी, जय शिवाजी” आशयाचे पत्र पाठविण्यात असल्याचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी ठरवले त्या अनुसंगाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली देखील जिल्हा भरातून एक लाख पत्रं उपराष्ट्रपतींना पाठविण्याची सुरुवात जीपीओ पोस्ट ऑफिस नाशिक येथून केली. या प्रसंगी  त्रपती शिवाजी की जय अशा घोषणा देऊन पत्र टपाल पेटीत टाकण्यात आले.

या देशाचा लोकशाहीचा पाया हाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार आदर्श होता, असे गौरव उदगार संविधान समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे. देशाचे पंतप्रधान सुद्धा छत्रपती शिवरायाच्या चरणी आपली निष्ठा दाखवितात. जिथे या देशाचे पंतप्रधान स्वतःला जनतेचा सेवक आणि देशाचे चौकीदार समजतात. तिथ हे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू संसदेला स्वतःची खाजगी मालमत्ता समजतात का ? छत्रपतींच्या अस्मिता देशभरात मानत असल्याची लाज वाटणारेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय भवानी जय शिवाजी या घोषणेचा आक्षेप घेऊ शकतात. देशाच्या उपराष्ट्रपतींनी केलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जाहीर निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांनी २० लाख “जय भवानी, जय शिवाजी” या आशयाचे पत्र उपराष्ट्रपतींना पाठविण्याचे ठरले असून नाशिक जिल्ह्यातून एक लाख पत्रं पाठविण्यात आली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *