
पंतप्रधान मोदींनी स्वीकारल्या कंगनाच्या शुभेच्छा आणि मानले आभार
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क). पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या वादग्रस्त म्हणून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणानेही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनीही शुभेच्छांबद्दल कलाकार आणि दिग्गजांचे आभार मानले आहेत.
कंगणा राणावतने मोदींना व्हिडिओ शेअर करुन शुभेच्छा दिल्या आपल्यासारखे पंतप्रधान देशाला लाभले हे आमचं भाग्य असल्याचं कंगणाने व्हिडिओत म्हटलंय. देशातील कोट्यवधी लोकं आपल्यावर प्रेम करतात, मीही त्यापैकीच एक असून आपणास भेटण्याचा योग आला, पण बोलणं कधीही झालं नाही, असं कंगणा म्हणाली आहे. नरेंद्र मोदींनी कंगनाचे हे ट्विट रिट्विट करत कंगनाजी आपले आभार असं म्हटलं आहे.