नंदुरबार: कोरोना सोबत दोनहात करुन तहसिलदर व पत्रकार परत आले

Featured नंदुरबार
Share This:

कोरोना सोबत दोनहात करुन तहसिलदर व पत्रकार परत आले

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): नंदुरबार येथील तहसिलदार भाऊसाहेब थोरात व दैनिक लोकसत्ता , आय बी एन लोकमत न्यूज चैनल चे प्रतिनिधी निलेश पवार यांनी कोरोना सोबत दोनहात करत असताना. त्याची लागन झाल्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचार घेऊन परत आपल्या कामावर आजपासून रूजू झाले आहेत. कोरोना संसर्ग मुक्त झाल्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात सोमवारी प्रथमच कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी नायब तहसीलदार गोपाळ पाटील , श्रीमती गंगावणे , मंडळ अधिकारी यु. जे. पठाण उपस्थित होते . पत्रकार निलेश पवार कोरोना संसर्ग मुक्त झाल्यानंतर त्याच्या निवासस्थानी नंदुरबार शहरातील पत्रकारानी त्याच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. निलेश पवार यांच्या सौभाग्यवतींनी औक्षण केले. याप्रसंगी पत्रकार रविंद्र चव्हाण , विशाल माळी , रणजित राजपूत , देवेंद्र बोरसे , धनराज माळी , गजेंद्र शिंपी , जगदिश सोनवणे , देवेंद्र माळी , जगदिश ठाकुर , जितेंद्र जाधव , वैभव करवंदकर व असंख्य पत्रकार मित्र सोशल डिस्टन चे पालन करत पवार यांचे स्वागत केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *