
नंदुरबार: जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 11 – अक्कलकुव्यात 2 महिला तर शहाद्यात 1 पुरुष बाधित
नंदुरबार: जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 11 – अक्कलकुव्यात 2 महिला तर शहाद्यात 1 पुरुष बाधित
नंदुरबार (तेज समाचार डेस्क): शहादा येथील २३ वर्षीय युवकाच्या कोविड १९ चाचणीचा अहवाल काल पॉझिटीव्ह आला होता. आज सकाळी प्राप्त अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक तर अक्कलकुव्यातील दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिघांची भर पडल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रूग्णसंख्या ११ वर पोहचली आहे
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता अकरावर पोहोचली असून, तिन्ही कॉरंटाईन करण्यात आलेल्या संशयित रुग्णांच्या वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. अक्कलकुवा येेथे २ महिला तर शहाद्यात एका पुरूषाचा समावेश आहे. ६६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ६३ निगेटिव्ह व ३ पॉझिटिव्ह आलेले आहेत. कोविड 19 चा संसर्ग झालेल्या त्या 3 व्यक्ती पूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांचा संपर्क साखळीतील आहेत. त्यात अक्कलकुवा येथील २३ व ४८ वर्षीय महिला आणि शहादा येथील ४८ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. या तिन्ही संशयितांना पूर्वीच क्वॉरंटईन करण्यात आले होते.