
रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरी तर्फे सहा. धर्मादाय आयुक्त कार्यालयात हँड फ्री सॅनिटायझर स्टँड वाटप
नंदुरबार ( वैभव करवंदकर). नंदुरबार येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरी तर्फे हँड फ्री सॅनिटायझर स्टँड देण्यात आले. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त मा.श्री.सु. ज.लाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ़ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष आशिष खैरनार, सचिव पुष्कर सुर्यवंशी, सदस्य सज्जाद सैय्यद, मनोज सूर्यवंशी, अनिकेत अग्रवाल, सागर चित्ते, सागर कदम यांच्या सह सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.