
बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाईचा मागणीसाठी आमरण उपोषण
नंदुरबार (वैभव करवंदकर) पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने पाच वर्षाच्या बालिकेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून नंदुरबार नगर पालिकेने बालिकेचे मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मयुर चौधरी तसेच मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, सहा महिन्यांपूर्वी कुत्रे आडवे आल्याने अपघात होऊन मृत्युमुखी पडलेले बलराज राजपूत यांचे भाऊ मोहित राजपूत हे १४ डिसेंबर पासून नंदुरबार नगर परिषदे समोर मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला पाठिंबा म्हणून समस्त माळी पंच मंडळ, राणी लक्ष्मीबाई सांस्कृतिक मंडळाचा पदाधिकारी यांनी पत्र दिले तसेच भाजप चे डॉ. रविंद्र चौधरी व भाजप चे नगरसेवक उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. नगर परिषदचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनीही उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली व नगर पालिका करत असलेल्या कारवाईसंदर्भात पत्र देऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. नगर पालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी खुल्याशाने समाधान न झाल्याने उपोषणर्त्यांनी उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवणार आहेत. उपोषणस्थळी नागरिकांनी भेटी देऊन स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शवत आहेत.
– पुढील मागण्यांसाठी उपोषण
- मृत्युमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिचा मृत्यूला कारणीभूत असलेल्या नंदुरबार नगर परिषदेचा ठेकदाराचा ठेका रद्द करण्यात यावा.
- कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढण्याचे एक कारण- बेकायदेशीर असलेले उघड्यावरील मांस विक्री दुकान आणि चिकन- मटणाचे पदार्थ बनवून विक्रीचा गाड्या यावर त्वरित कडक कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.
- नंदुरबार नगर पालिकेचे कर्मचारी किंवा अधिकारी अथवा ठेकेदार यांचा हलगर्जीपणामुळे नागरिकास अपंगत्व आल्यास किंवा नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अपंगत्व आलेल्या व्यक्तीला तात्काळ २ लाख रुपये आणि मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये हानी भरपाई नगर पालिकेने द्यावी.
- मोकाट कुत्र्यांना रेबीज इंजेक्शन देणे तसेच नसबंदी कार्यक्रम त्वरित राबविणे तसेच मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त त्वरित करावा.
- मोकाट गुरांमुळे ही अनेक लहान मोठे अपघात घडत असतात मोकाट गुरांचाही कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
- पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत पावलेली.
- हिताक्षी माळी हिचा कुटुंबियांना हानीभरपाई देण्यात यावी ती हानीभरपाई मुलीचा मृत्यूस कारणीभूत असलेल्या ठेकेदाराकडून वसूल करून त्वरित मुलीचा कुटुंबियांना मिळवून द्यावी.
- उपोषणास विविध संघटना, संस्था, व्यायाम शाळा यांनी पाठिंबा देण्यासाठी संपर्क.