नंदुरबार नगरपरिषदेने सौर उर्जा प्रकल्प उभा करुन त्यामार्फ उर्जा व आर्थिक बचत होत आहे

Featured जळगाव
Share This:

नंदुरबार नगरपरिषदेने सौर उर्जा प्रकल्प उभा करुन त्यामार्फ उर्जा व आर्थिक बचत होत आहे

नंदुरबार (वैभव करवंदकर): नंदुरबार नगरपरिषदेतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सौर उर्जा प्रकल्पाची संकल्पना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी मांडली आणि हा प्रकल्प मागील तीन महिन्यांपासुन कार्यान्यीत करण्यात आलेला आहे.सौर उर्जा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबविणारी नंदुरबार नगरपरिषद महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरली आहे.सदर प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत निधी मिळालेला असुन 939 किलो वॅटचा हा प्रकल्प सुरु झाल्यापासुन नंदुरबार नगरपरिषदेची उर्जा बचतीसह आर्थिक बचत मागील तीन महिन्यापासुन होत आहे.हा प्रकल्प एकुण 10 साईटसवर लावण्यात आलेला असुन झराळी वॉटर पंपींग स्टेशन, झराळी वॉटर फिल्टर प्लांट, एस.टी.पी.प्लांट नळवा आणि इतर ठिकाणी सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. सध्या प्रकल्पा मधून तयार होणाऱ्या वि‍जेतून महिन्याला 6 ते 7 लक्ष रुपयांची बचत होत आहे.उर्वरित ठिकाणी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर परवानगी दिल्यास सदर बचतीमुळे येणाऱ्या 5 ते 6 वर्षात वर्षात प्रकल्प किंमत संपूर्णपणे वसूल होणार आहे.या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मोनो क्रिस्टलाईन सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आलेले आहेत.मोनो क्रिस्टलाईन सौर ऊर्जा पॅनल देशात पहिल्यांदाच सरकारी प्रकल्पामध्ये वापरण्यात आलेले आहेत.त्याचप्रमाणे एबीबी आणि फ्रॉनीयस ह्या युरोपियन कंपन्यांचे इंवर्टर वापरलेले आहेत.तसेच डीसी केबलिंग करताना फ्रॉगलिप आणि ऑपटीमाईस्ड स्ट्रिंगिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. ह्या प्रकल्पात वापरण्यात आलेल्या स्ट्कचरचे स्टॅड विश्लेषण करण्यात आलेले आहे.अशा प्रकारे सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट डिझाईन याची सांगड या प्रकल्पाच्या माध्यमातून नंदुरबार नगर परिषदेणे घातली आहे व त्याचा परिणाम आत्तापर्यन्त झालेल्या चांगल्या वीज उत्पादणातून दिसून येत आहे.सदर प्रकल्पातून नियमित विज उत्पादन व्हावे यासाठी देखाभाल दुरुस्ती सुध्दा नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.हा प्रकल्प अभूतपूर्व डिझाईन मुळे तंत्रशिक्षणातील तरुण विद्यार्थी,शिक्षक, उद्योजक,नागरिक यांना मार्गदर्शक ठरणार आहे. लॉकडाऊन मध्येही अत्यावश्यक सेवांमध्ये ह्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले.नंदुरबार नगरपालिकेची पुढील 25 वर्षे वीजबचत तर होणारच आहे मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सर्व नंदुरबार वासीयांना अभिमानस्पद वाटावा अश्या प्रकल्पामुळे शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *