नंदुरबार मर्चंट बँकेतर्फे कोरोना पार्श्वभूमीवर 5 लाखांची मदत

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार  (तेज समाचार डेस्क) : राज्यासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतांना सामाजिक बांधिलकी म्हणून नंदुरबार  येथील नंदुरबार मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या निधीत सुमारे पाच लाखांचे योगदान देण्यात आले.

सोमवारी सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना नंदुरबार मर्चंट बँक प्रशासनातर्फे दोन स्वतंत्र धनादेश सुपूर्द करण्यात आले. यात कोविंड -१९ निधी अंतर्गत पंतप्रधान मदत निधीत ०३ लाख रुपये चा धनादेश दिला.  तसेच मुख्यमंत्री मदत निधीत  ०२ लाख रुपयेचा  धनादेश  नंदुरबार येथील नंदुरबार मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या सर्वानुमते ठरावातून शासनाला सहकार्य करण्यात आले. दि. नंदुरबार मर्चंट को- ऑप बँकेतर्फे केवळ नंदुरबारच्या स्थानिक अडचणी प्रसंगी नव्हे तर राज्य आणि देशभरात वेळोवेळी उद्भवलेल्या अनेक संकट प्रसंगी खारीचा वाटा उचलण्याची जबाबदारी पार पाडली असल्याचे नंदुरबार मर्चंट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास पाठक यांनी सांगितले. नंदुरबार मर्चंट बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना धनादेश सुपूर्दप्रसंगी नंदुरबार मर्चंट बँकेचे चेअरमन किशोरभाई वाणी, व्हाईस चेअरमन बळवंत जाधव, संचालक दिलीप शहा, अँड .प्रशांत चौधरी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *