नंदुरबार लायन्स क्लबतर्फे जिल्हा रुग्णालयास कोविड टेस्टिंग केबिन भेट

Featured नंदुरबार
Share This:
नंदुरबार (तेज समाचार प्रतिनिधि ) : कोरोना आपत्तीमध्ये संशयित रुग्णाचे तपासणीसाठी नमुने जिल्हा रुग्णालयात घेण्यात येतात. हे नमुने घश्यातून घेताना डॉक्टर मंडळींना सुद्धा संसर्गाचा  धोका असतो ही बाब डॉ.राजेश कोळी यांनी लायन्स क्लबला निदर्शनास आणून दिली व त्यावर उपाय सुद्धा सुचवला. त्यानुसार जळगाव येथील आर्या फाऊंडेशन येथून कोविड टेस्टिंग केबिन मागावण्याचे ठरले. क्लबच्या सदस्यांनी निधी संकलन केला व सदर केबिन मागवण्यात आली आणि जिल्हा रुग्णालयास सदर केबिन सोपवण्यात आली.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, डिस्ट्रिक जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र माहेश्वरी, डॉ.देवेंद्र लांबोळे यांची विशेष उपस्थिती होती. हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, सिव्हिल हॉस्पिटलचे  कोविड नोडल ऑफिसर डॉ.राजेश वसावे, आयएमएचे अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य डॉ.राजेश वळवी यांचे सहकार्य लाभले. ही केबिन जळगाव जिल्ह्यातून नंदुरबार पर्यंत आणण्यासाठी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. या केबिनरुपी सुरक्षा कवचामुळे  जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची सुरक्षा जपली जाणार आहे. याबद्दल रुग्णालय प्रशासनाने समाधान व्यक्त केले व लायन्स परिवाराचे आभार मानले. हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेयेरमन डॉ.राजेश कोळी, अध्यक्ष समिरभाई शहा, सचिव सतीश चौधरी, ट्रेझरर नितीन जैन यांनी परिश्रम घेतले तसेच लायन्स परिवाराने सहकार्य केले. सद्याच्या कोरोना आपत्ती वातावरणात असा उपयुक्त प्रोजेक्ट घेऊन लायन्स परिवाराने पुन्हा एकदा जेथे कमी तेथे आम्ही हे सिद्ध केले आहे. या प्रकल्पबद्दल समाजातून लायन परिवाराचे अभिनंदन होत आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *