रेड झोन च्या दिशेने नंदुरबार जिल्ह्या वाटचाल

Featured नंदुरबार
Share This:

रेड झोन च्या दिशेने नंदुरबार जिल्ह्या वाटचाल

 

नंदुरबार (तेज समाचार प्रतिनिधी):  अक्कलकुवा येथील एक  ५७  वर्षीय पुरुष आणि शहादा येथील एका १५ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शहादा येथील मुलगी दोन दिवसापूर्वी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. नंदुरबार जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १३ झाली आहे. ५२ व्यक्तिंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आज दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात शहादा येथील एक मुलगी (१५) तसेच अक्कलकुवा  येथील एक पुरुष (५७)  दोघांची स्वँबचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शहादा येथील मुलगी दोन दिवसापूर्वी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाचा संपर्कात आली होती. नंदुरबार जिल्ह्यात मागील ११ कोरोणा पॉझिटीव्ह होते त्यात ०२ ची भर पडुन आता १३ कोरोणा पॉझिटीव्ह रुग्ण झाले आहेत. यात नंदुरबार येथील ०४, शहादा येथील ०५ तर अक्कलकुवा येथील ०४ रुगणांचा समावेश आहे. यात शहादा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.५२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *