नंदीची मिरवणूक काढून महादेवा मार्फत वरुण राजाला आमंत्रण

Featured जळगाव
Share This:

नंदीची मिरवणूक काढून महादेवा मार्फत वरुण राजाला आमंत्रण.

पाऊस येण्यासाठी यावलकरांचा श्रद्धापूर्वक शेतकरी हिताचा उपक्रम.

यावल (सुरेश पाटील): यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पाऊस अत्यल्प अवेळी झाला,पेरण्या झाल्या नंतर पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आणि येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादनावर फार मोठा विपरीत परिणाम होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जाणार आहे पर्यायी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वरुण राजाचे तथा पावसाचे आगमन तात्काळ होण्यासाठी महाजन गल्लीतील नागरिकांनी नंदीची मिरवणूक काढून महादेवा मार्फत वरुण राजाला पाऊस येण्यासाठी/ आमंत्रण देण्यासाठी नंदीची भव्य मिरवणूक महाजन गल्लीतून महादेव मंदिरा पर्यंत काढून आमंत्रण देण्यात आले.
यावल शहरातील न्यु एकता मंडळ व शेतकरी बांधव मजूर वर्ग मिळून महादेवाला पाऊस लाबंल्याने पाऊस लवकर पडू दे असे साकळे घातले दादाजी भजनी मंडळ भजन करीत महाजनगल्ली ते तारेकेश्वर महादेव मंदिर पर्यंत नंदीची मिरवणुक काढुन धोंडी धोंडी पाणी दे म्हणत गावातील शेतकरी बंधुनी नंदीची पुजा करून धोंडीधारक व्यक्तिवर पाणी टाकुन वरूण राजाचे लक्ष वेधले आहे यामुळे पावसाचे तथा वरुणराजाचे आगमन केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *