नांदेड : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला जबर मारहाण

Featured महाराष्ट्र
Share This:

नांदेड : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला जबर मारहाण

नांदेड  (तेज समाचार डेस्क): कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आज वीकेंड लॉकडाऊन सुरू केलाय. या दरम्यान नागरिकांनी बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आलंय. तर विनाकारण व विना मास्क बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

नांदेडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने विना’मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरूद्ध कारवाई करत दंड ठोठावला असताना दुचाकी चालकाने दगड फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रभाकर निवृत्तीराव कच्छवे असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.गंभीर जखमी अवस्थेतील नाईक पो.कॉ. प्रभाकर कच्छवे यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून आरोपी दुचाकी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी जिल्ह्यातील चूडावा येथे आज सकाळी विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई सुरु होती. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सैदाणे व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी वसमत फाटा परिसरात नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यांनी कोरोनानियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई सुरु केली. त्याचवेळी, चुडावा येथील रहिवासी असलेला एका दुचाकीस्वार विनामास्क तेथून जात होता. त्यास पोलिसांनी कारवाईसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याने पोलिसावरच हल्ला केला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *