
एप्रिल ते जून महिन्यांत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली
एप्रिल ते जून महिन्यांत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क) : असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्सने (AMFI) (एएमएफआय) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत त्यापूर्वीच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीपेक्षा अधिक, 17.96 लाख खात्यांची वाढ झाली आहे. जादा रिटर्नच्या अपेक्षेमुळे कोरोना व्हायरस (Corona virus) महामारीच्या काळात म्युच्युअल फंडांकडे (Mutual fund) ग्राहकांचा, गुंतवणूकदारांचा ओढा वाढला असल्याचे तज्ञांचे मत आहे.
जूनच्या अखेरीस गुंतवणूकदारंची खाती 9,15,42,092 झाली आहेत. तर मार्च अखेरपर्यंत ही खाती 8,97,46,051 होती. तज्ज्ञांच्या मतांनुसार, जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या काळात मार्च महिन्यापासून शेअर बाजारात घसरण सुरू झाली. नव्या गुंतवणुकदारांनी याला एका संधीच्या रुपात पाहिले आणि त्यातून इक्विटी तसेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले. एप्रिल ते तीन या कालावधीत इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूकदारांच्या खात्यांची संख्या 10 लाखांनी वाढली. ही संख्या 6.27 कोटींवरून वाढून 6.37 कोटी झाली आहे. आगामी एक वर्षात म्युच्युअल फंडामध्ये रिटर्न 20 टक्क्यांपर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत मार्केट आजघडीला सरासरी 25 टक्क्यांनी खालावलेले आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात आणि आर्थिक घडामोडींत जवळपासच्या 90 टक्क्यांच्या स्तरावर वाढ मिळाली तर मार्केटमध्ये तेजी येऊ शकते. फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडाचा व्यवसाय 28 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
एप्रिल महिन्यात हा व्यवसाय 25 लाख कोटी रुपयांवर होता. तो आता परत 26 लाख कोटींवर आला असल्याचे एएमएफआयने माहिती दिली.