
मूर्तीजापुर : महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
मूर्तीजापुर : महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
मूर्तीजापुर (तेज समाचार प्रतिनिधि ):मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो शेतकऱ्यांची फसवणूक करणारे महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना विविध समस्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेले शिवसेनेने शेतकऱ्यांच्या विश्वासघात केला आहे आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन पाळले नाही शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे कडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला तसेच महिला व मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढत नुकतेच हिंगणघाट येथील प्राध्यापिका ला जिवंत जाळण्याची घटना घडली तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार बलात्कार व असे विविध घटना घडल्या हे तरुण मुली महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करून विविध मागण्याचे निवेदनं अधिकारी यांचेमार्फत सादर करण्यात आले याप्रसंगी जिल्हा राजुभाऊ नागमते, नगराध्यक्षा मोनालीताई गावंडे , तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर , नारायण भटकर , कोमल तायडे ,डाॅ अमित कावरे , नगरसेवक सचिव देशमुख ,राहुल पाटिल नगरसेवीका स्नेहा नाकट,विजया कझरकर ,राधा तिवारी , यूवा नेते पप्पु मुळे ,सुनिल गीरी ,महादेव रेखाते ,गजानन नाकट ,कमलाकर गावंडे अमोल पिंपळे ,उज्वल अग्रवाल ,अमित नागवान ,अमोल पिंपळे,हर्षल साबळे ,अखिल भटकर ,राम जोशी ,योगेश फरसुले , नितीन टाले ,किशोर भटकर ,बाबु देशमुख ;डाॅ जगदीश कडू ,नंदकिशोर राऊत,जाबीर खान धोत्रा , विजय डोईफोडे,राम खंडारे , ॠषिकेश वारे ,व इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे हे शासनाचे कर्तव्य असतो त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करून सातबारा कोरा करावा अशी प्रतिक्रिया भाजपाचे युवा नेता कोमल खाडे यांनी व्यक्त केली