
दारूच्या नशेत साथीदारावर खुनी हल्ला
मुंबई (तेज समाचार डेस्क): दारूच्या नशेत दोन मित्रांची भांडणे झाली. एका मित्राने दुस-या मित्राच्या हाताला चावा घेतला. या कारणावरून दुस-या मित्राने चावा घेणा-या मित्राला फावड्याच्या दांड्याने मारून खून करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि. 1) रात्री पावणे नऊ वाजता वडमुखवाडी येथे घडली.
जितु संक्लाल यादव (वय 26, रा. वडमुखवाडी) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत ओंकार मोहन बवले (वय 27, रा. भोसरी) यांनी सोमवारी (दि. 2) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय शहाणे असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बवले यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी जितु आणि त्याचा मित्र अजय हे दोघेजण दारू पिऊन बसले होते. दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाले. त्यात अजयने जितुच्या हाताला चावा घेतला. त्यावरून चिडून जितु याने अजयला फावड्याच्या दांड्याने मारून खून करण्याचा प्रयत्न केला. अजय याने हा प्रकार फिर्यादी ओंकार यांना सांगितला. त्यावरून फिर्याद देण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.