
दसेरा मैदान जवळील मनपा बगीचा जवळील खोलीत कुंटणखाना उध्दवस्त
धुळे (तेज समाचार डेस्क) : देशात लॉक डाऊन दुसरा टप्पा सुरू झाला आहे.याचाच फायदा घेत अवैध रित्या व्यवसाय करणाऱ्या चा उत वाढला आहे.वॉचमन खोलीचा वापर कुंटणखाना साठी
शेतच कुपंण खात आहे.अशीच मनपा स्थिती आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, शहरातील मालेगाव रोड दसेरा मैदान जवळ मनपाच्या मालकीची ओपन स्पेस आहे.या जागेवर अॅम्युझमेंट पार्क तयार होणार होते ते मनपा आज पर्यंत तयार करु शकले.या नंतर या जागेला गुरांचा कोंडवाडा तयार केला गेला.तिथे एक वॉचमनसाठी खोली तयार करून तिथे सिसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला.काही दिवसात हे बंद झाले.या जागेत मनपा ने मोठ्या प्रमाणात झाडे लावली.ती जळाली.मात्र वॉचमन खोलीचे प्रमाण वाढले.याच खोलीत देहविक्री व्यवसाय सुरू झाला.याची कुणकुण काही नागरिकाना आज सायंकाळी हा प्रकार अचानक पणे उघडकीस आला.यावेळी खोलीत तीन महिला व दोन पुरुष विचित्र स्थिती आढळुन आले.खोलीत दारुच्या बाटल्या पडलेल्या होत्या.निरोधची पाकिटे पडलेली नागरिकांनी पाहिले.पॉश एरीयात हा प्रकार उघडकीस आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली.हि माहिती पोलिसांना मिळाली आहे.पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.हि खोली पाडण्यासाठी नागरीकानी आग्रह धरला.
मनपा वॉचमनसाठी हि खोली तयार केली होती.
वॉचमन ला कोणाच अभय आहे.ह्या वॉचमनला कोणाची मदत आहे.काही प्रश्न अनुत्तरीत आहेत.
मनपा ने रस्त्यावर बाजूला तयार केलेल्या ह्या खोलीचा अवैधरित्या वापर केला जात आहे.हि वार्ता परिसरात वाऱ्या सारखी पसरली.त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
मनपा आयुक्त काय कारवाई करणार याकडे धुळेकर नागरिकांचे लक्ष लागून आहे.