
मुंबईकरांनो, जरा जपून… पावसाबद्दल हवामान खात्याकडून इशारा
मुंबईत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे
मुंबई (तेज समाचार डेस्क): शहर आणि उपनगरात रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत 192.17 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील 24 तासात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Warning for Mumbaikars as next 24 hours will be of heavy rainfall vjb 91)
शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रात्री ही पावसाचा जोर कायम राहिला. शहर,पाश्चिम तसेच पूर्व उपनगरात दमदार पाऊस कोसळला. पूर्व उपनगराला पावसाने सर्वाधिक झोडपून काढलं. शहर 176.96 मिमी,पश्चिम उपनगर 195.48 मिमी तर पूर्व उपनगर 204.07 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. सांताक्रूझ 234.9 mm,कुलाबा 196.8,राम मंदिर 260.7,महालक्ष्मी 205.5,जुहू विमानतळ 193.5,मीरा रोड 236.5,भाईंदर 213.5 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या तीन तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आज देखील मुंबईतील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा प्रदेशिक हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईत पावसाचा हाहा:कार, 14 जणांचा मृत्यू
शनिवारी रात्री पावसामुळे मुंबईत दोन ठिकाणी 14 जणांचा मृत्यू झाला. विक्रोळी येथे तीन जणांचा तर चेंबूरमध्ये 11 जणांचा घराचा छत कोसळून मृत्यू झाला. चेंबूर आरसीएफ भारत नगर येथे दरड कोसळून घर कोसळून 11जणांचा मृत्यू झाला. दरम्यान विक्रोळी येथील डोंगरळ भाग असलेल्या पंचशीलनगरमध्ये घराचा छत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. डोंगराळ वस्तीमध्ये एका घरावर दुसरे असे तीन-चार घरे एकमेंकावर कोसळली. यात ढिगाऱ्याखाली अडकून तीन जणांचा मृत्यू झाला