मुंबई निसर्ग चक्रीवादळ : 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामधे बदल
मुंबई (तेज समाचार डेस्क):चक्रीवादळ निसर्गचा धोका लक्षात घेता भारतीय रेल्वेने चक्रीवादळ निसर्गचा धोका लक्षात घेता भारतीय रेल्वेने मुंबई टर्मिनलवरून सुटणार्या पाच रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तर, दोन रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याची माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे.
• 06346 तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष 2.6.2020 रोजी मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-कल्याण मार्गे वळविण्यात आली आहे. (मडगाव-पनवेल ऐवजी)
• 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे 2.6.2020 रोजी मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-दौंड कोरड लाईन-मनमाड मार्गे वळविण्यात आली आहे. (मडगाव-पनवेल-कल्याण-इगतपुरी-नाशिक रोड ऐवजी)
• 02432 नवी दिल्ली-तिरुअनंतपुरम विशेष रेल्वे 2.6.2020 रोजी सुरू होणारी सुरत-वसई रोड-कल्याण-पुणे-मिरज-लोंडा-मडगाव मार्गे वळविण्यात आली आहे. (सूरत-वसई रोड-पनवेल-मडगाव ऐवजी)
• 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम विशेष रेल्वे 3.6.2020 रोजी सुरू होणारी मनमाड-दौंड चोरड-पुणे-मिरज-लोंडा-मडगाव मार्गे वळविण्यात आली आहे. (नाशिक रोड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-मडगाव ऐवजी)
• 02431 तिरुअनंतपुरम-नवी दिल्ली विशेष रेल्वे 2.6.2020 रोजी सुरू होणारी मडगाव येथे नियमित केली जाईल आणि कोकण रेल्वेने आवश्यक असल्यास ती वळविली जाईल.