
मुंबई- विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांचा दंड!
मुंबई- विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिकेने वसूल केला ‘इतक्या’ लाखांचा दंड!
मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मास्कची सक्ती केली आहे. तर मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पालिकेने चांगलाच दणका दिला असून आतापर्यंत तब्बल 1 लाख 60 हजारांहून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आलाय.
नागरिकांकडून वसूल करण्यात आलेल्या या दंडामुळे 3 कोटी 49 लाखांहून अधिक रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झालीये. राज्य सरकारच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला मास्क वापर बंधनकारक करण्यात आलंय. मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध 9 एप्रिलपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आलीये. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींकडून सुरुवातीला 1000 रुपये दंड आकारला जात होता. तो आता 200 ठोठवण्यात येतोय.
विनामास्क व्यक्तींवर दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलीस दल आणि वाहतूक पोलीस यांच्यासोबत संयुक्त कारवाई नियमितपणे करण्यात येणारे. रेल्वे किंवा लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्कचा वापर केला नसेल तर रेल्वे पोलिसांकडून दंड आकारण्यात येईल.