मुंबई: क्रॉफर्ड मार्केटजवळ भरधाव कारचा धुमाकूळ, 4 जणांचा चिरडून मृत्यू

Featured मुंबई
Share This:

मुंबई: क्रॉफर्ड मार्केटजवळ भरधाव कारचा धुमाकूळ, 4 जणांचा चिरडून मृत्यू

मुंबई (तेज समाचार डेस्क): मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात सोमवारी एका भरधाव कारने धुमाकूळ घालत अनेकांना चिरडलं. क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलच्या जवळ एका भरधाव कारने ८ जणांना चिरडलं असून यातील ४ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. अचानक जनता हॉटेलच्या समोरील रोडवरून भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. तिने हॉटेलसमोर उभा असलेल्या ८ जणांना उडवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *