
मुंबई: 200 पेक्षा अधिक कोरोना मृतदेहाची वाहतूक करनार रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू
मुंबई (तेज समाचार डेस्क): कोविड रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या सीलमपूर इथं राहणाऱ्या आरिफ खान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गरजूंना मदत करण्यासाठी आरिफ आपल्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. आपला जीव धोक्यात घालून आरिफ यांनी आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी मदत केली आहे.
कोरोना झाल्यानंतर आरिफ खान हे रुग्णालयात उपचार घेते होते. पण देवदुतासारखं इतरांसाठी काम करणाऱ्या कोरोना वॉरिअरचा मृत्यू झाला.