
मुंबई : कोरोनाबाधित रूग्ण फिरत होता रस्त्यावर
मुंबई : कोरोनाबाधित रूग्ण फिरत होता रस्त्यावर
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात कोरोनाने थैमान घातलं घातलं आहे. मुंबईतंही रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. ही संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नुकतंच मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये एका कोरोनाबाधित रूग्ण सर्रासपणे रस्त्यावर फिरत असल्याचं आढळून आलं. या व्यक्तीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रूग्णाला शोधून त्याला पुन्हा रूग्णालयात दाखल केलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रूग्ण मानसिक आजाराने ग्रस्त आहे. या रूग्णाला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी या रूग्णाने तिथल्या डॉक्टर आणि नर्सला सुद्धा त्रास दिला होता. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी आम्ही एक वेगळं कोविड सेंटर सुरु करण्यात आलं आहे. नायर रूग्णालयात हे कोविड सेंटर असून या रूग्णाला त्या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे.
मुंबई माहापालिकेचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, “मानसिक आरोग्याने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मुंबईत कोविड केअर सेंटर नाहीत. हाच विचार करता विशेष वार्ड सुरू करण्याचा निर्णय या केसमुळे घेण्यात आला आहे.”