मुकेश अंबानी ‘या’ चार छोट्या कंपन्या खरेदी करणार
मुकेश अंबानी ‘या’ चार छोट्या कंपन्या खरेदी करणार
मुंबई (तेज समाचार डेस्क): मुकेश अंबानी काही महिन्यात रिलायन्स फर्निचर बँन्ड, मिल्क बास्केट, ईफार्मसी स्टार्टअप नेटमेड्स आणि लॉन्जरी रिटेलर झोवामी या चार कंपन्या खरेदी करणार असल्याचं कळतंय. रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रात पाय पसरवू लागली आहे. कंपनी आपली इकॉमर्स प्लॅटफॉर्म मजबूत करणार आहे. अर्बन डॉलर सोबत गेल्या काही महिन्यापासुन यासंबंधीची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप डील फायनल झालेली नाही. अर्बन डॉलरला रिलायन्स जवळपास 3 कोटी डॉलर म्हणजेच 225 कोटी रुपयांना विकत घेण्याची शक्यता आहे. मिल्क बास्केटच्या बिगबास्केट आणि अॅमेझोन इंडिया सोबत बोलणं सुरु होतं. पण त्यांचा व्यवहार झाला नाही. अर्बन लॅडर डॉलर आणि मिल्क बास्केटकडून रिलायन्सशी बोलणी सुरु असल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यावर बोलण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, रिलायन्सने काही महिन्यांपूर्वी ने फ्यूचर रिटेल ही कंपनी विकत घेतली. याची माहीती या व्यवहाराशी संबंधीत असलेल्या चार अधिकाऱ्यांनी दिली आहे.