भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी सौ.विद्या पाटील

Featured जळगाव
Share This:

भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी सौ.विद्या पाटील

यावल ( सुरेश पाटील): भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यावल तालुकाध्यक्ष म्हणून यावल येथील सौ. विद्याताई सूर्यकांत पाटील यांची नियुक्ती केल्याचे पत्र भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी दिले.
सौ.विद्याताई सूर्यकांत पाटील यांची यावल तालुका भाजपा महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे काल दि.11 रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, संचालक नरेंद्र नारखेडे, पंचायत समिती सभापती सौ. पल्लवी चौधरी, जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता भालेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, डॉ. कुंदन फेगडे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, नारायण बापू चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, सरपंच जिल्हा संघटना अध्यक्ष पुरूजित चौधरी, माजी शहराध्यक्ष हेमराज उर्फ बाळू फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांनी नवनियुक्त महिला आघाडी अध्यक्षा सौ. विद्याताई पाटील यांच्यासह इतर नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून स्वागत केले.
भाजपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे हे प्रथमच यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात यावल तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी आले. परंतु यावल तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रसिद्धी माध्यमांना कोणतेही माहिती न दिल्याने भारतीय जनता पार्टीला प्रसिद्धीची आवश्यकता राहिली नाही का ? याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *