खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला
खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला
लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरी, लोकसभेतील चर्चेमध्ये सहभाग, विविध कायद्यावरच्या चर्चेत घेतलेला भाग या आधारे सगळ्या खासदारांमध्ये भारतात दुसरा नंबर..
धुळे (तेज समाचार डेस्क): संसदरत्न पुरस्कार कमिटीने १७ व्या लोकसभेतील व राज्यसभेतील १० खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला आहे.
धुळ्याचे लोकप्रिय खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संसद रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार २०१० मध्ये त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आग्रहास्तव prime point foundation and e-magazine presence यांनी स्थापित केले.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे म्हणणे होते कि, लोकशाहीत संसद हे एक मंदिर असते व पूर्ण देशाचे प्रश्न येथे मांडले जातात, कायदे बनविले जातात त्या अनुषंगाने येथे अतिशय महत्वपूर्ण चर्चा व वादविवाद (debate) होते. त्यामुळे जे खासदार मोठ्या प्रमाणात ह्या वादविवाद (debate) मध्ये भाग घेतात व जनसामान्याच्या कल्याणाशी जोडलेले प्रश्न सभागृहात मांडतात व सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतात. असे सगळ्यात प्रभावशाली खासदार पुरस्कार दिला गेला पाहिजे त्या प्रमाणे १४व्या, १५ व्या, १६ व्या लोकसभेच्या वेळेस प्रभावी खासदारांना पुरस्कार दिले गेले होते.
१७ व्या लोकसभेच्या (आताच्या) विविध कार्यात प्रश्न विचारणे, वेगवेगळ्या चर्चेत भाग घेणे. त्यात पहिला नंबर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा नंबर लागतो व भारतात दुसरा नंबर धुळ्याचे लोकप्रिय खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा लागतो. त्यांनी १७ व्या लोकसभेत एका वर्षात (लोकसभेच्या कार्यकाळात) धुळे लोकसभेचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी एकूण २०२ प्रश्न हे जनसामान्यांच्या हितांचे मांडले व वेगवेगळ्या वादविवाद (debate) मध्ये सुद्धा भाग घेतला.
एकूण एकूण १० खासदारांना पुरस्कार देण्यात आले आहे. त्यात धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरेंचा संपूर्ण देशात दुसरा नंबर लागला हि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
खासदार डॉ. सुभाष भामरे उच्च विद्याविभूषित आहेत. हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. त्याचा त्यांना फायदा झाला.
संसदरत्न पुरस्कार देण्याचे निकष :
१. संसदेतील उपस्थिती, २. कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग, ३. सभागृहात प्रश्न विचारणे, ४. सभागृहातील विविध चर्चेत सहभाग
हे निकष डोळ्यासमोर ठेऊन वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात आला. त्यातील टॉप फाइव मध्ये महाराष्ट्रातील तीन खासदारांचा समावेश आहे. १. सुप्रिया सुळे २. खासदार डॉ. सुभाष भामरे ३. डॉ. अमोल कोल्हे ४. सुधीर गुप्ता (मध्यप्रदेश) ५. बिद्युत महतो (जमशेदपूर) यांचा समावेश आहे.
तसेच खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी १६ व्या लोकसभावेळी देशाचे संरक्षण राज्यमंत्री पद उत्तम प्रकारे सांभाळले आहे. त्यांनी काळात इतिहासात नोंदाविण्याजोगे काम केले आहे. तसेच वेळो वेळी देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे नेतृत्व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांना मिळालेला हा पुरस्कार योग्य आणि पात्र व्यक्तीस मिळालेला आहे व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र व धुळे लोकसभा संघात अभिमान वाटत असून हजारो कार्यकर्ते व नेत्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे अभिनंदन केले आहे.
