
दोंडाईचा उड्डाणपुलावर अंधारामुळे मोटरसायकल व रिक्षाचा भीषण अपघात
दोंडाईचा उड्डाणपुलावर अंधारामुळे मोटरसायकल व रिक्षाचा भीषण अपघात….
अपघातात सिन्धी काँलनीतील तरूण गंभीर जखमी,लाईट व स्पीड ब्रेकर बसविण्याची नगरसेवक गिरधारीलाल रूपचंदाणींची मागणी…
दोंडाईचा (तेज समाचार डेस्क): येथे नुकतेच दिनांक १९ जुलै सोमवार रोजी रात्री ८.३० वाजता दोंडाईचा-शहादा रस्त्यावरील उड्डाणपुलावर व अँपे रिक्षा गाडीला लाईट नसल्यामुळे सिन्धी काँलनीतील तरूण याच्या मोटरसायकलचा रिक्षासोबत भीषण अपघात झाला आहे. यात संबधीत तरूणांवर धुळे येथील खाजगी हाँस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक १९ जुलै सोमवार रोजी रात्री ८.३० वाजता सिन्धी काँलनीतील तरूण श्री निखील ग्यानचंद केसवाणी (२६) हा दोंडाईचा-शहादा बायपास उड्डाणपुलावरून आपली मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८- ए.क्यु-३६७४ ह्या गाडीने घरी सिन्धी काँलनीत जात असताना समोरून रामी येथील हेड-लाईट बंद असलेली अँपे रिक्षा दोंडाईचाकडे येत असताना समोरासमोर भीषण अपघात झाला. यावेळी दोघी गाड्यांच्या नुकसानीसोबत मोटरसायकल चालक निखील केसवाणी यास डोक्यास,हातास,पायास गंभीर इजा झाली आहे. यावेळी तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.मात्र वैधकीय अधिकारी श्री अर्जुन नरोटे यांनी तपासून लगेच धुळे येथे दाखल करण्याचे सागितले. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.
ह्याअगोदरही उड्डाणपुलावर नेहमीच होणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघाताबाबत सिन्धी पंचायतचे अध्यक्ष व मा.नगरसेवक श्री गिरधारीलाल रूपचंदाणी यांनी बांधकाम विभाग, नगरपालिका, जिल्हाधिकारी धुळे,तहसिलदार शिंदखेडा, स्थानिक आमदार यांना माहिती देत. उड्डाणपुलावर लाईट,स्पिड ब्रेकर बसविण्याची मागणी केली आहे.