थरारक : सुनेने डोक्यात बॅट मारून केला सासूचा ‘खेल खल्लास’

Featured मुंबई
Share This:

 

मुंबई (तेज समाचार प्रतिनिधि). मुंबईतील चेंबूरमध्ये सासु- सुनेच्या भांडणाचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. चेंबूरमध्ये टिळकनगरमध्ये राहणाऱ्या एका सूनेने आपल्या सासूच्या डोक्यात बॅट मारून तिची हत्या केली आहे. घडलेल्या प्रकाराने संपुर्ण परिसर हादरून गेला आहे. टिळक नगरपरिसरात पेस्टम सागर कॉलनीत एस. आर. ए. इमारतीत सज्जा पाटील म्हणजे सासू ह्या आपला दत्तक मुलगा निलेश पाटील आणि सून संजना पाटीलसह राहत होत्या. निलेश हा कुठेही नोकरीला नव्हता तो रोजच्या दैनंदिन रोजगारावर जायचा आणि सज्जा पाटील ह्या एका मंदिराजवळ भीक मागायच्या. त्यांना मिळेल त्या पैशातून घर चालायचं.

– बाथरूममध्ये घसरून पडण्याचा केला बनाव
सज्जा पाटील नेहमी आपल्या सुनेला यावरून हिणवायच्या. त्यामुळे सूनेला राग अनावर झाला आणि तिने सासूच्या डोक्यात बॅट घातली आणि त्यांची हत्या केली. सून संजनाने केलेली हत्या लपवण्यासाठी सासू बाथरूममध्ये घसरून पडली असल्याचं सांगितलं. पण टिळकनगर पोलिसांनी सज्जा बाई यांचा मृतदेह शवविच्छदनासाठी नेला असता तेव्हा त्यावेळी डॉक्टरांनी ही हत्या असल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्यानंतर तपास करताना आधी मुलगा निलेशची चौकशी केली मात्र त्यांना काही हाती लागलं नाही. मात्र सुनेची चौकशी करताना काही धागेदोरे हाती लागले तेव्हा खाकीचा हिसका दाखवल्यावर सूनेने आपला गुन्हा मान्य केला. पोलीसांनी सुनेला अटक केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *